नाशिक, शिर्डी, पुणे टॅक्सी प्रवास महाग

 

ऐन उन्हाळ्यात मुंबई ते नाशिक, पुणे, शिर्डी गारेगार टॅक्सी प्रवास महागणार आहे. परिवहन प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैङ्गकीत शेअर टॅक्सी सेवेच्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून ही भाडेवाढ लागू होण्याची शक्यता आहे.

मुंबई-शिर्डी मार्गासाङ्गी वर्ष 2013 मध्ये शेवटची भाडेवाढ देण्यात आली होती. आता केवळ मुंबई-नाशिकसाङ्गी 100 रुपये आणि मुंबई-पुणेसाङ्गी 50 रुपये भाडेवाढीस मान्यता देण्यात आली आहे.

टॅक्सी भाडयात सुधारणा सुचविण्यासाङ्गी राज्य सरकारने नेमलेल्या खटुआ समिती आणि टॅक्सी संघटना युनियनने केलेल्या मागण्या विचारात घेऊन सुधारित भाडेवाढीला मंजुरी देण्यात आली आहे.

असा असेल सुधारित भाडे दर

मुंबई ते नाशिक (175 किलोमीटर) आणि मुंबई ते शिर्डी (265 किलोमीटर) मार्गावरील एसी टॅक्सींचे आधीचे भाडेदर 475 रुपये आणि 625 रुपये होते. ते आता अनुक्रमे 575 आणि 825 रुपये असेल,

मुंबई-पुणे (155 किमी) मार्गावरील नॉन एसी टॅक्सी 450 ऐवजी 500 रुपये, एसी टॅक्सींसाङ्गी 525 ऐवजी 575 रुपये दर असेल.