गुंतवणुकीच्या नावाखाली केली फसवणूक

गुंतवणुकीच्या नावाखाली 16 जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका विरोधात गुन्हा नोंद केला आहे. माहीम येथे तक्रारदार येथे राहतात. तीन वर्षांपूर्वी त्याची एकाशी ओळख झाली होती. त्याने जोगेश्वरी येथे एक हॉटेल चालवण्यासाठी घेतले असल्याचे सांगितले. हॉटेल व्यवसायासाठी त्याच्याकडे गुंतवणूक करावी. गुंतवणूकब्ै केल्यास तो चांगला व्याजदर देईल असे सांगितले होते. त्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार याने 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. काही महिने त्याने त्यांना रक्कम दिली. त्यानंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले. त्याच दरम्यान त्याने चार लाख रुपये परत केले होते. उर्वरित पैशाची मागणी केली असता त्याने पैसे दिले नाहीत. चौकशी दरम्यान त्याने आणखी 16 जणांकडून पैसे घेऊन अशा प्रकारे फसवणूक केल्याचे समजले. त्या सर्वांकडून 1 कोटी 60 लाख रुपये घेतले होते. मात्र कोणालाही पैसे परत न करता तो हॉटेल बंद करून पळून गेला. हा प्रकार लक्षात येताच त्या सर्वांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.