मुंबईत कोरोना व्हेरिएंट हातपाय पसरतोय 

कोरोना व्हेरिएंट जेएन-1 व्हेरिएंटचे नवीन 19 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. 8 जानेवारी रोजीच्या अहवालात 22 रुग्ण आढळले होते. यानंतर पुन्हा केलेल्या जिनोम सिक्वेसिंग अहवालात नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोना व्हेरिएंट हातपाय पसरतोय अशीच स्थिती आहे. 

देशात जेएन-1 व्हेरिएंटचा प्रसार झपाटय़ाने होत असून काही रुग्ण दगावले आहेत. राज्यातही जेएन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत राज्यात 250 जेएन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.