बुमराह-अश्विनच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा संघ गारद; दुसऱ्या कसोटीत हिंदुस्थानचा इंग्लंडवर 106 धावांनी विजय

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानच्या संघानं इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. हिंदुस्थानच्या विजयात नऊ विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा सिंहाचा वाटा आहे.

399 धावांचे आव्हानात्मक पाठलाग करताना इंग्लंडचा संघ विशाखापट्टणम येथे चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात 292 धावांत गारद झाला. बुमराहने फिरकीपटू रविचंद्रन अश्विनसोबत अप्रतिम गोलंदाजी केली. अंतिम डावात दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर बुमराहने वेगवान गोलंदाज टॉम हार्टलीला बाद करून विजयावर शिक्कामोर्तब केलं.

शुभमन गिलनं तिसऱ्या दिवशी शानदार 104 धावा करून हिंदुस्थानचा सामन्यात पुनरागमनाचा पाया रचला आणि पहिली कसोटी जिंकणाऱ्या इंग्लंडला आव्हानात्मक लक्ष्य दिलं. इंग्लंडनं आक्रमक पाठलाग सुरू केला. हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी टिचून केल्यानं इंग्लंडचं काही चालेना. एकापाठोपाठ एक अशा विकेट पडल्या आणि हिंदुस्थानचा विजय झाला.