मेट्रो कॉन्ट्रक्टरला 370 कोटींची नोटीस

 

सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये मेट्रोची कामे सुरू असून या कामांसाठी नेमलेल्या पंत्राटदारांनी मुंबई महानगरपालिकेचा  370 कोटी रुपये मालमत्ता कर थकवला आहे. थकीत मालमत्ता कर भरावा याकरिता पालिककेने मेट्रोच्या चार पंत्राटदारांना गेल्या आठवडय़ात नोटीस बजावली आहे. या पंत्राटदारांबरोबरच आणखी पाच मोठय़ा थकबाकीदारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.