पेरूमध्ये उडत्या एलियनची दहशत, गावकऱ्यांवर केला हल्ला

सध्या पेरू देशातील नागरिकांनी सात फूट उंच उडणाऱ्या एलियनची दहशत घेतली आहे. घाबरलेल्या गावकऱ्यांनी असा दावा केला आहे की त्यांच्यावर 7 फूट उंच उडणाऱ्या एलियनने हल्ला केला आणि त्यांच्या चेहऱ्याचे चावे घेतले. पण स्थानिक पोलिसांना मात्र वेगळाच संशय येतो आहे. त्यांच्या मते अशा घटनांमागे अवैध सोन्याचे खाणकाम करणाऱ्यांचा हात असण्याची शक्यता आहे.

 इकिटू म्हणजेच स्थानिकांच्या  म्हणण्यानुसार,  ‘एलियनचे हल्ले  11 जुलैपासून सुरू झाले, त्यांना 7 फूट उंच , चांदीच्या रंगाचे मोठे डोके असलेले प्राणी दिसले. आणि त्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले. पोलिसांच्या माहितीनुसार बेकायदेशीर खाण कामगारांनी 29 जुलै रोजी एका 15 वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. अपहरणादरम्यान मुलीच्या मानेला  जखमा झाल्या. तर  आणखी एका माणसाच्या डोक्यात “एलियन्स” ने घाव घातल्याचे  वृत्त आहे. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले  की ‘सात फूट उंच एलियन’ हे ब्राझीलच्या ‘ओ प्राइमरो कमांडो द कॅपिटल’, ‘कोलंबियाच्या ‘क्लॅन डेल गॉल्फो’, ‘फार्क’ सारख्या ड्रग कार्टेलशी संबंधित सोन्याचे माफिया आहेत, ज्यांनी लॅटिन अमेरिकेला कित्येक वर्ष लुटले आहे. आता हे खाण कामगार  पेरूमध्ये  ‘एलियन’ च्या नावाखाली दहशत पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी सांगितले  की या कार्टेल्सचे उद्दिष्ट स्थानिक लोकांना त्यांच्या घरात कोंडून ठेवणे आणि पर्यायाने सोन्याच्या खाणींपासून  दूर ठेवणे आहे.पेरूच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार या “गोल्ड माफिया” गटांना  संबंधित सैन्याने त्यांच्याच देशातून बाहेर काढले आहे आणि आता ते बेकायदेशीरपणे सोन्याची शिकार करण्यासाठी पेरूवर उतरले आहेत. या  टोळ्या या परिसरात  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे.