चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी, अजित पवार बनले पुण्याचे पालकमंत्री

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. त्यांच्याआधी चंद्रकांत पाटील हे पुण्याचे पालकमंत्री होते. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

मिंधे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेले बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडून काढून घेत ते हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे. वर्धाच्या पालकमंत्र्याची जबाबदारी सुधीर मुनगंटीनार यांच्याऐवजी आता धर्मरावबाबा अत्राम यांना देण्यात आली आहे. धाराशिव आणि परभणी या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तानाजी सावंत यांच्याकडे होते. त्यातील परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे.

नवे पालकमंत्री खालीलप्रमाणे असतील

  • पुणे- अजित पवार
  • अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
  • सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
  • अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
  • भंडारा- विजयकुमार गावित
  • बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
  • कोल्हापूर- हसन मुश्रीफ
  • गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
  • बीड- धनंजय मुंडे
  • परभणी- संजय बनसोडे
  • नंदूरबार- अनिल भा. पाटील
  • वर्धा – सुधीर मुनगंटीवार