मुख्यमंत्र्यांसाठी राखीव खुर्चीवर अजित पवार बसले, ‘मनोरा’ आमदार निवास भूमिपूजनाच्या कार्यक्रमात काय घडले?

मुंबईत मनोरा आमदार निवास इमारत बांधकामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांसाठी राखीव ठेवलेल्या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बसले. यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले.

मनोरा आमदार निवासस्थान पाडण्यात आले असून त्याजागी नवे टोलेजंग आमदार निवास बांधले जाणार आहे. येथे 40 आणि 28 मजल्यांच्या दोन इमारती बांधल्या जाणार असून यातील प्रत्येक फ्लॅट 1000 स्क्वेअर फूटचा असणार आहे. या इमारतीच्या बांधकामाचा खर्च 1300 कोटींपर्यंत जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांसाठी या इमारती बांधल्या जाणार आहेत.

आमदार निवासाच्या पुनर्बांधणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित होते. त्यांची तब्येत बरी नसल्याची माहिती मिळतेय.

मंचावर नक्की काय घडलं?

भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सत्ताधारी मंडळी जमलेले असताना मंचावर घडलेल्या घटनेची सध्या राजकीय वर्तुळाच चर्चा आहे. मंचावर मुख्यमंत्र्यासाठीही राखीव खुर्ची होती. मात्र मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने या खुर्चीवर उपमुख्यमंत्री अजित पवार बसले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच त्यांना या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. मात्र मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अजितदादा बसताच राहुल नार्वेकर यांनी चपळाईने या खुर्चीवर लावलेले स्टिकर काढून टाकले.

याबाबत विधानपरिषेदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मला असे वाटते की त्यांच्याकडे सगळे निर्णय आहे. त्यांच्या मनात काही असू शकते, असे सूचक विधान अंबादास दानवे माध्यमांशी बोलताना केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)