भाजप सरकार असंवेदनशील, ही तर लाजिरवाणी गोष्ट… अंबादास दानवेंची टीका

मणिपूरमध्ये मे महिन्यापासून हिंसाचार सुरू आहे. अद्यापही या राज्यातील काही भागात अशांतता आहे. दरम्यान मंगळवारी या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच मणिपूरमध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. मात्र पहिल्याच दिवशी सदन अवघ 11 मिनिटं चाललं. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपला फटकारले आहे.

”माणिपूरचे भाजप सरकार किती असंवेदनशील आहे बघा. फक्त 11 मिनिटे सदन चालवले गेले आणि राज्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसेवर कोणतीही चर्चा झाली नाही. लज्जास्पद गोष्ट ही आहे की सदनातील 10 आमदार केवळ ‘सुरक्षेच्या’ कारणास्तव अधिवेशन सत्रासाठी उपस्थित राहू शकलेले नाहीत. जिथे आमदारच सुरक्षेला घेऊन चिंतेत आहेत. तिथे सामान्य माणसाची अवस्था काय असेल याचा अंदाज आपल्याला येतो”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.