अमित शहा खोटं बोलताहेत! संसदेत उल्लेख केलेल्या कलावतीने गृहमंत्र्यांचं बिंग फोडलं

>> प्रसाद नायगावकर, यवतमाळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेवर बोलताना काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी एका कलावती नावाच्या महिलेचाही उल्लेख केला. या महिलेला मोदी सरकारने मदत केल्याचा दावा शहा यांनी केला. मात्र आता ही महिला समोर आली असून अमित शहा खोटे बोलत असल्याचे तिने म्हटले आहे. यामुळे अमित शहांसह मोदी सरकारचेही बिंग फुटले आहे.

राहुल गांधी एका कलावती नावाच्या महिलेच्या घरी गेले होते. तिची करुण कहाणी त्यांनी संसदेत सांगितली. त्यानंतर 6 वर्ष ते सत्तेत होते. त्या कलावतीला मोदी सरकारने वीज, घर, शौचालय, धान्य आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या, असा दावा अमित शहा यांनी संसदेत केला. मात्र आता शहा यांनी ज्या कलावतीचा उल्लेख केला तिने समोर येत हा दावा खोडून काढला आहे.

शहांनी उल्लेख केलेल्या महिलेचे नाव कलावती बांदुरकर आहेत. त्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील रहिवासी आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानंतर त्यांनी समोर येत अमित शहा खोटे बोलत असल्याचे म्हटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)


राहुल गांधी घरी आले आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्याला भरीव आर्थिक मदत केली. राहते घर आणि घरातील साहित्यही काँग्रेस काळातच मिळाल्याचे कलावती यांनी सांगितले.