प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या 25 व्या वर्षी मुंबईत घेतलं स्वत:चं घर

मुंबईत स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. अभिनेत्री अनन्या पांडे हिने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. अनन्याने मुंबईत स्वतःचं घर घेतलं आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी तिने घर घेतल्याची माहिती चाहत्यांनी दिली. अनन्याने स्वत: तिच्या नवीन घरात पूजा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

अनन्याने सोशल मीडियावर तिच्या घरातल्या पूजेचा फोटो शेअर केला आहे तर घराबाहेर नारळ वाढवतानाचा देखील तिने व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत तिने ”माझे स्वत:चे घर, नवी सुरुवात करण्यासाठी सर्वांच्या प्रेमाची व शुभेच्छांची गरज आहे”, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. अनन्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी व तिच्या सहकलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.