राजौरी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाचे मोठे यश

जम्मू-कश्मीरमध्ये अजूनही दहशतवाद्यांच्या कारवाया सुरुच आहेत.जम्मू कश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातील बाजीमल येथे गुरुवारी दुसऱ्या दिवशीही चकमक सुरू आहे. या कारवाईत सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच घटनास्थळांहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. या भगात सुरक्षा दलाची शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

या भागात गुरुवारी सकाळी पुन्हा चकमक सुरू झाली. यात सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यात कारी या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. तो लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख दहशतवाद्यांपैकी एक होता. तसेच या चकमकीत दोन अधिकाऱ्यांसह चार जवान शहीद झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुणांना दहशतवादाकडे वळवण्यासाठी पाकिस्तानातील कारी या दहशतवाद्याला पाठवण्यात आले होते. तो आयईडी स्फोटके बनवण्यात पटाईत होता. तसेच तो बराच काळ गुहांमध्ये लपून दहशतवादी कारवाया करत होता. चकमकीत त्याचा खात्मा झाल्याने सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.

पीआरओ डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात पाकिस्तानी दहशतवादी कोरी मारला गेला आहे. त्याला पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले होते. कोरी हा लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. गेल्या वर्षभरापासून तो राजौरी आणि पूंछमध्ये सक्रिय होता. तो धनगरी आणि कंदी हल्ल्याचा मास्टरमाईंडही असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी या दहशतवाद्यांना पाठवण्यात आले होते. त्याला आयईडी स्फोटके पेरणे, गुहांमधून हल्ले करणे आणि स्निपर बनण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.