शेअर ट्रेडिंगमधील चार्ट पॅटर्न

>> प्रवीण धोपट

मार्केट व्यवहार असला तरी शक्याशक्यतेचा खेळ आहे. पुढे काय होईल याचा अंदाज नसतो, तरीही काही अंदाज बांधले जातात. त्याला जोड असते इतिहासात घडलेल्या काही प्राईस मूव्हमेंटची. प्राईस मूव्हमेंटचे काही ठराविक  पॅटर्न्स तयार होतात. हे पॅटर्न्स चार्टवर तयार होणाऱ्या प्राईसमधून आकार घेतात आणि ते डोळ्यांना दिसतात. ज्यावरून भविष्यातले अंदाज वर्तवले जातात. महत्त्वाचे काही चार्ट पॅटर्न इथे देत आहे.

 हेड अॅण्ड शोल्डर – याच्या नावातच डोके आणि खांदा यांच्या रचनेचा आकार आहे. यातले तीन भाग महत्त्वाचे – एक खांदा, त्यानंतर तयार झालेले डोके आणि त्यानंतर तयार झालेला खांदा. दोन खांद्यांमध्ये एक डोके या आकाराप्रमाणे प्राईस आकार घेते. डोक्यानंतर मानेच्या ठिकाणी एक नेक लाईन चितारली जाते. जर ही नेक लाईन खालच्या बाजूला क्रॉस झाली, तर प्राईस खाली येण्याची शक्यता असते. हा सिग्नल बेअरीश रिव्हर्सल म्हणून ओळखला जाते. याविरुद्ध इन्व्हर्टेड हेड अॅण्ड शोल्डर पॅटर्न हा बुलीश सिग्नल म्हणून ओळखला जातो.

  1. डबल टॉप अॅण्ड बॉटम – हा पॅटर्न अपट्रेंडनंतर किंवा डाऊनट्रेंडनंतर तयार होतो. अपट्रेंडनंतर डबल टॉप, तर डाऊनट्रेंडनंतर डबल बॉटम. प्राईस आपल्या रजिस्टंस लेव्हलला दोन वेळा टच करूनही प्राईस वर न जाता तिथेच रेंगाळते आणि खाली येते. हा बेअरीश सिग्नल असतो. याउलट प्राईस आपल्या सपोर्ट लेव्हलला दोन वेळा टच करूनही प्राईस खाली नाही तर वर जाते. हा बुलीश सिग्नल असतो.
  2. असेंडिग किंवा डिसेंडिग ट्रँगल – हा एक पंटिन्यूएशन चार्ट पॅटर्न आहे. आपल्या ओरिजनल डिरेक्शनला जाण्याआधी प्राईस काही काळ आहे तिथेच रेंगाळते. असेंडिंग ट्रँगलमध्ये प्राईस हायर लो तयार करते आणि एक हॉरिझाँटल रजिस्टंन्स लाईन तयार करते. याउलट डिसेंडिग ट्रँगलमध्ये प्राईस लोअर हाय तयार करते आणि हॉरिझाँटल सप्लाय लाईन तयार करते. ट्रेडर बाइंग करण्यापूर्वी रजिस्टंस लेव्हलच्या वर ब्रेकआऊटची वाट बघतो, तर त्याच्या उलट सेलर सेल करण्यापूर्वी सपोर्ट लेव्हलच्या खाली ब्रेक होण्याची वाट पाहत असतो.
  3. सिमेट्रिकल ट्रँगल – सिमेट्रिकल ट्रँगल हा न्यूट्रल चार्ट पॅटर्न आहे. प्राईस एका सेरिसमध्ये लोअर हाय आणि हायर लो तयार करीत राहते. एका ठरावीक रेंजमध्ये रेंगाळत राहते. याला मार्पेटमधला कन्सॉलिडेशन पिरीअड म्हणून ओळखला जातो. एक प्रकारे हा विश्रांतीचा काळ असतो, पण याच काळात कसलेले ट्रेडर दबा धरून असतात. जेव्हा ही रेंज ब्रेक होते तेव्हा मार्पेट वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने सुसाट पळते.
  4. कप अॅण्ड हँडल – कप अॅण्ड हँडल हा बुलीश पंटिन्युअस पॅटर्न म्हणून ओळखला जातो. हा पॅटर्न शक्यतो दीर्घकालीन चार्टवर पाहायला मिळतो. कपाच्या आकाराचा किंवा इंग्रजी यू आकाराचा हा पॅटर्न हँडलच्या ठिकाणी काही काळ रेंगाळतो आणि अपट्रेंडकडे सरकतो.

अर्थातच हे पॅटर्न्स तंतोतंत खरे ठरतात असे नाही. याच्या जोडीने टेक्निकल अनॅलिसीस आणि रिस्क मॅनेजमेंटची जोड असायलाच हवी.

 (लेखक दीपंकर फिनपॅप इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. येथे गुंतवणूक सल्लागार आहेत.)