अमेरिकेत जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील मेरीलँडमध्ये मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे ‘फ्रान्सिस स्कॉट्स ब्रिज’ कोसळला. अमेरिकन वेळेनुसार पहाटे दीडच्या सुमारास जहाज पुलावर आदळले. यानंतर आग लागली आणि जहाज नदीत बुडाले. पुलावरील अनेक वाहने बुडाली आहेत. तसेच या जहाजात सर्वच्या सर्व 22 हिंदुस्थानी कर्मचारी होते.

पुलावरून किमान 20 जण बुडाले, त्यातील दोघांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. पुलावरील अपघातानंतर दोन्ही बाजूंच्या सर्व लेन बंद करून वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिंगापूरचा ध्वज असलेल्या या जहाजाचे नाव ‘डाली’ असून ते श्रीलंकेची राजधानी कोलंबोला जात होते. हे जहाज 948 फूट लांब होते. हा ब्रिज पॅटापस्को नदीवर 1977 साली बांधण्यात आला होता. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जहाजाच्या धडकेने या पुलाचा मोठा भाग नदीत कोसळताना व्हिडीओत दिसत आहे.