हम दिल दे चुके सनम! फिल्मी कहाणी प्रत्यक्ष घडली, नवऱ्याने बायकोचे प्रियकराशी लग्न लावून दिले

प्रातिनिधिक फोटो

हम दिल दे चुके सनम चित्रपट आठवतोय का ? 1999 साली प्रसिद्ध झालेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण या तिघांच्या यामध्ये प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात जे घडलं होतं तसं प्रत्यक्षातही घडलं आहे. मात्र प्रत्यक्षात घडलेल्या कहाणीमध्ये थोडे वेगळे ट्विस्ट होते. प्रत्यक्ष कहाणीत प्रेयसी ही नवऱ्याऐवजी प्रियकरासोबत गेली. आणि प्रेयसीला सोबत नेण्यापूर्वी प्रियकराची जाम धुलाई झाली.

बिहारच्या नावदा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती, महिलेच्या भांगेत कुंकू भरताना दिसतोय. ही व्यक्ती म्हणजे या महिलेचा प्रियकर आहे. नवरा कामावर गेला असताना ही महिला रात्री उशिरा तिच्या प्रियकराच्या घरी गेली होती. आतापर्यंत या दोघांचे संबंध लपून राहिले होते, मात्र यावेळी गावकऱ्यांना या दोघांच्या संबंधांबद्दल कळालं होतं. गावकऱ्यांनी या दोघांना रंगेहाथ पकडलं. गावकऱ्यांनी या दोघांना बंदी बनवून ठेवत प्रियकराला बेदम मारहाण केली होती. हा सगळा प्रकार सुरू असताना तिथे महिलेचा नवरा आला.

नवऱ्याने त्याच्या बायकोला आणि तिच्या प्रियकराला जवळच्या मंदिरात नेलं आणि दोघांना लग्न करण्यास सांगितलं. मग 3 मुलांचा बाप असलेल्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं आणि गावकऱ्यांनी दोघांचे लग्न झाल्याचे जाहीर केले.