कर्मचाऱ्यानेच बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, बॉलिवूड अभिनेत्रीला बसला धक्का; गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेत्री निकिता रावलबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेत्रीच्या स्टाफ कर्मचाऱ्याने  बंदुकीचा धाक दाखवून तिची साडेतीन लाखांची लुट केली आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून तिने मालाड बांगूर नगर पोलीस स्थानकात धाव घेत एफआयआर नोंदवला आहे. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.

सुत्रांकड़ून मिळालेल्या माहितीनुसार, निकीताकडून पैसे तेव्हा लुटले ज्यावेळी बहुतेक कर्मचारी उपस्थित नव्हते. लूट केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. या घटनेने निकीताला प्रचंड धक्का बसला आहे. तिने मुंबईतील मालाडच्या बांगुर नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

या घटनेबाबत निकीताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या घटनेने मला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मला अद्याप विश्वास बसत नाही की, माझ्याच स्टाफपैकी एकाने असे कृत्य केले आहे. वाईट गोष्ट हीच आहे की, लोकं आधी विश्वास कमावतात आणि तो कमावल्यावर त्याचा असा वापर करतात. शिवाय ज्यावेळी बंदुकीचा धाक दाखवला त्यावेळी आपण हतबल असतो. त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली जाते.

पुढे अभिनेत्रीने सांगितले, आरोपींनी सुमारे साडेतीन लाख रुपये रोख आणि माझ्याजवळ असलेले दागिने हिसकावले. जे मी खूप मेहनतीने कमावले होते. हा फार भयंकर अनुभव होता आणि जो मी  शब्दात सांगू शकत नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. निकिताने अनिल कपूरसोबत ‘ब्लॅक अँड व्हाईट’ चित्रपट आणि ‘गरम मसाला’ मध्ये जॉन अब्राहमबरोबर तसेच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती टॉलिवूडमध्येही काम करत आहे.