चंद्रकांतदादा म्हणतात, माझेच पालकमंत्री पद धोक्यात!

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात शिंदे-फडणवीस यांच्या जोडीबरोबर अजित पवार यांचा दादा गटही सहभागी झाल्यामुळे सत्तेतील खाती विभागली गेली आहेत. काही भाजपची तर काही शिंदे गटाची खाती दादा गटाला मिळाली आहेत. अजितदादांना अर्थखाते मिळाले आहे. ते पुण्याचे असल्यामुळे आता अर्थखात्याबरोबर पुण्याचे पालकमंत्री पदही त्यांना मिळेल, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. असे चित्र असताना पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना आज विधान भवन परिसरात भेटलेल्या पुण्याच्या एका व्यक्तीने आदराने नमस्कार करत म्हटले, दादा, या पाल्यावर लक्ष ठेवा. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, अरे, लक्ष ठेवतो; पण सध्या या पालकमंत्र्यांचेच पद आता धोक्यात आले आहे.