क्लॉडिया गोल्डीन यांना अर्थशास्त्राचे नोबेल

महिला आणि पुरुष यांच्या कमाईतील असमानता आणि श्रमिक बाजारातील सहभागाचा दिशादर्शक अभ्यास मांडून मार्केटविषयीची जाण वाढवणारे संशोधन करणाऱया प्रोफेसर क्लॉडिया गोल्डीन यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असणाऱया गोल्डीन यांच्यासह आजवर फक्त तीन महिलांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. विसाव्या शतकात आधुनिकीकरण, आर्थिक वाढ आणि नोकरदार महिलांचे प्रमाण वाढते असूनही पुरुष आणि महिला यांच्या कमाईतील फरक दीर्घ काळ फारसा कमी झाला नव्हता. आधीच्या पिढीतील महिलांच्या निर्णयांचा पुढील पिढीतील महिलांच्या प्रगतीवर प्रभाव पडत असतो असे संशोधनातून अधोरेखित करताना गोल्डीन यांनी भूतकाळातील संदर्भांचे दुवे वर्तमानाशी जोडले आहेत, असे नोबेल समितीने म्हटले आहे.