कोरोना चिंता वाढवतोय..गेल्या चोवीस तासात 602 नवे रुग्ण, 5 जणांचा मृत्यू

देशभरात पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मागच्या 24 तासाच कोरोनाने 602 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाचे 4 हजार 440 रुग्ण सक्रिय आहेत. कोरोनासोबतच त्याच्या उप-प्रकार जेएन.1 ची प्रकरणे सतत वाढत आहेत.

मंगळवारी जेएन.1 च्या 312 नवीन प्रकरणे समोर आली होती. कोरोनाचा नवा व्हेरिएंट 10 राज्यांमध्ये पसरला आहे. केरळमध्ये याचे जास्त रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये मंगळवारी जेएन.1 चे 147 प्रकरणं समोर आली आहे. याव्यतिरिक्त गोव्याहून 51, गुजरात 34, महाराष्ट्र 26, तामिळनाडू 22, दिल्ली 16, कर्नाटक 8, राजस्थान 5, तेलंगणा 2 आणि ओडिशातून 1 प्रकरण समोर आले आहे.

इंसाकोगच्या वृत्तानुसार, डिसेंबर 2023मध्ये कोरोनाचे 279 प्रकरणं जेएन.1 ची होती. नोव्हेंबरमध्ये 33 रुग्णसंख्या होती. आरोग्य मंत्रालयाने कोरोना जेएन.1 उपप्रकाराची प्रकरणे वेगाने वाढत असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणेने हा व्हेरिएंट घातक नसल्याचे सांगितले. मात्र याचा वेगाने प्रसार होतोय. मंगळवारी 24 तासात कोरोनाचे 573 प्रकरणं समोर आली आहेत. मागच्या 24 तासात एकाचा मृत्यू झाला होता. सोमवारी 636 प्रकरणं समोर आली. 21 ते 27 डिसेंबर दरम्यान कोरोनाची 4 हजार 452 रुग्णसंख्या समोर आली आहे.