मुंबईत अभिनेत्रीवर बलात्कार, उद्योगपती आरोपीला अटक

rape
प्रातिनिधिक फोटो

मुंबईतील एनएम जोशी मार्ग पोलीस स्थानकात एका अभिनेत्रीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पिडीतेने टांझानिया निवासी व्यावसायिकाविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन आरोपी वीरेन पटेल विरोधात बलात्कारासह विविध गुन्हे दाखल केले असून आरोपीला अटक केली आहे.

अभिनेत्रीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, वर्षभरापूर्वी विरेन पटेल नावाच्या व्यावसायिकाशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि 13 फेब्रुवारीपासून ती विरेन पटेलसोबत राहू लागली. दरम्यान वीरेन पटेल 28 मार्च 2023 रोजी अचानक माझ्या बेडरुममध्ये आला, त्याने रडत सांगितले की, मला तुझी आठवण येत आहे. त्यानंतर त्याचदिवशी रात्री त्याने जबरदस्तीने शारिरीक संबंध माझ्यासोबत ठेवले. मी जेव्हा रडू लागले त्यावेळी त्याने डिसेंबरमध्ये लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तो वारंवार शारीरीक संबंध ठेवू लागला. मात्र लग्न करणार असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र लग्नाचा विषय काढल्यावर तो टाळाटाळ करु लागला हे तिच्या लक्षात आले. त्यानंतर मी त्याच्यापासूनच दूर राहू लागले तसे त्याने जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर 11 एप्रिल रोजी तो त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमध्ये मला घेऊन गेला होता. त्यावेळीही त्याने माझ्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विरोध केल्यावर त्याने मारहाण केली.

अभिनेत्रीने आरोपी विरेन पटेल याच्याविरोधात बलात्कार, मारहाण आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. पिडीतेच्या तक्रारीवरुन विरेन पटेल विरोधात 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.