देशपातळीवर होणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा लोकसभा निवडणुकीनंतर घ्या! इंडियावाइड पॅरेंट्स असोसिएशनची मागणी

देशपातळीवर होणाऱया विविध अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश परीक्षा, राज्य आणि पेंद्रीय विद्यापीठाच्या परीक्षा आणि लोकसभा निवडणूक या एकाचवेळी होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांसाठी निर्माण होणाऱया समस्या लक्षात घेता निवडणूक आयोगाने विद्यापीठ अनुदान आयोग, एनटीए आणि विद्यापीठांना परीक्षांचे आयोजन निवडणुकीनंतर करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी इंडिया वाईड पॅरेंट्स असोसिएशनने देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आणि सीयूईटी यूजी, नीट यूजी आणि जेईई मेन यासह अनेक विद्यापीठांच्या परीक्षा एकाचवेळी येत आहे. त्यामुळे पॅरेंट्स असोसिएशनने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सक्रिय उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. इंडियावाइड पॅरेंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. अनुभा श्रीवास्तव सहाय यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात विद्यार्थ्यांविषयी चिंता व्यक्त केली. निवडणुकीच्या काळातच अनेक महत्त्वाच्या परीक्षा होणार आहेत. यावेळी वाहतूक, निवासाच्या अडचणी, जाहीर सभा, रस्ता अडवणे, वाहतूककाsंडी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे