कॅलिफोर्नियातील  पंचतारांकित स्टोअरवर 300,000 डॉलर्सचा दरोडा डिझायनर वस्तूंची चोरी

ग्लेनडेल, कॅलिफोर्निया येथील  एक उच्च श्रेणीतील डिझायनर स्टोअरवर मोठा दरोडा घातला गेला.स्थानिक पोलिसांच्या मते  सांगितले. यामागे  30 संशयितांचा हात असावा. या दरोडेखोरांनी केवळ चोरीवर समाधान मानले नाही तर अक्षरश: पळून जाताना हाताला लागतील ते कपडे, दागिने आणि विविध माल ओढून घेतला. हे  कॅलिफोर्नियातील एक अत्यंत लोकप्रिय आणि गजबजलेले स्टोअर आहे.  या घटनेमुळे  डाउनटाउन ग्लेनडेल परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. The Americana at Brand च्या  रिअल इस्टेट कंपनीने संशयितांची ओळख पटवणाऱ्याला  50,000 डॉलर्सचे  बक्षीस देऊ केले आहे. या घटनेवर टार्गेट, वॉलमार्ट, डॉलर जनरल आणि होम डेपोसारख्या स्टोअर्सनी   चिंता व्यक्त केली आहे. मुळातच करोनासारख्या संकटाशी सामना करून उद्योग व्यवसाय आर्थिक संकटातून जरा मान वर काढत आहेत. जर अशाप्रकारे दरोडे पडायला लागले तर व्यावसायिकांचे मोठेच नुकसान होईल.  अशा घटनांचा सामना करण्यासाठी,  व्यावसायिक   स्टोअर उघडे ठेवण्याची वेळ कमी करणे, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे  आणि स्मार्ट शॉपिंग कार्ट यांसारख्या उपायांची अंमलबजावणी करत आहेत. पण याचा  संभाव्य ग्राहक सेवा आणि विक्रीवर परिणाम होऊ शकतो.