भाजप नेत्याला ममता बॅनर्जी यांच्यावरची टीका भोवली; पश्चिम बंगालमध्ये आणखी एक तक्रार दाखल

पश्चिम बंगालमधील भाजप नेते आणि लोकसभेचे उमेदवार दिलीप घोष यांच्या अडचणी काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केलेली टीका त्यांना महागात पडली आहे. दिलीप घोष यांच्या विरोधात दुर्गापूरमध्ये आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. काजल दास नावाच्या महिलेने ही तक्रार केली आहे. त्याच्यावर भादंवि कलम 504 आणि 509 अन्वये दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेत्याला आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस

भाजपचे नेते Dilip Ghosh यांच्याविरोधात काजल दास यांनी तक्रार दिली आहे. एक महिला म्हणून मला घोष यांच्या वक्तव्याची चिंता वाटते. दिलीप घोष यांच्यासारखी ज्येष्ठ व्यक्ती एका महिला मुख्यमंत्र्यांचा कसा काय अपमान करू शकतात. अशी वक्तव्ये त्यांना शोभत नाहीत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दिलीप घोष यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कौटुंबीक पार्श्वभूमीवर त्यांनी टीका केली आहे.

भाजप नेत्याने ममता बॅनर्जींची खिल्ली उडवली; TMC ची निवडणूक आयोगात तक्रार

दिलीप घोष यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे चोहूबाजूंनी त्यांच्यावर जोरदार टीक होत आहे. तृणमूल काँग्रेसने घोष यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजप नेते दिलीप घोष यांनी व्यक्तिगत टीका करून आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. यावरून निवडणूक आयोगाने घोष यांना नोटीसही बजावली आहे. तर भाजपने नोटीस जारी करत त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.