ठसा – ऋतुराज सिंह

>> दिलीप ठाकूर

नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर बरेच महिने प्रक्षेपित होणाऱया अनेक प्रकारच्या मालिकांचे युग येताना देशातील विविध भागांतून मुंबईच्या मनोरंजन क्षेत्रात आलेल्या अनेक प्रकारच्या कलाकारांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा चांगलाच ठसा उमटवला. असाच एक लक्षवेधक अभिनेता ऋतुराज.

20 फेब्रुवारी रोजी सकाळीच बातमी आली, ऋतुराजचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. पंधरा दिवसांपूर्वीच तब्येत बिघडल्याने ऋतुराजला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. योग्य उपचार केल्यावर तो घरीदेखील येऊन सर्व काही सुरळीत सुरू होते, पण अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले, पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

ऋतुराज याचे पूर्ण नाव ऋतुराजसिंह चंद्रकांत सिसोदिया. जन्म राजस्थानमधील कोटा येथील. शिक्षण दिल्लीत. लहान वयातच तो अमेरिकेत शिक्षणासाठी गेला. भारतात परतल्यावर अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी तो 1993 साली मुंबईत आला आणि बॅरी जॉन यांच्या अभिनय प्रशिक्षण पेंद्रात अतिशय आवडीने अभिनयासंदर्भात अनेक गोष्टी जाणून घेतल्या, आत्मसात केल्या. अतिशय शुद्ध हिंदी, भरपूर वाचन आणि आपण विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्यावरचा स्पष्ट पह्कस यामुळे प्रत्यक्ष मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकताच त्याला भरपूर संधी मिळत गेली. फरक इतकाच की, चित्रपटापेक्षा त्याने मालिकांच्या विश्वावर लक्ष पेंद्रित केले आणि त्यात कमालीचे सातत्य ठेवले. ‘तहकिकात’, ‘बनेगी अपनी बात’, ‘कुटुंब’,‘सतरंगी ससुराल’, ‘आहट’, ‘मेरी आवाज ही पहचान है’,‘ त्रिदेविया’, ‘यह रिश्ता क्या कहलाता है’ इत्यादी अनेक मालिकांतून तो घराघरांत पोहोचला. ‘दिया और बाती’, ‘हिटलर दीदी वॉरियर’, ‘अनुपमा’ या मालिकांतील त्याच्या कामाचे विशेष काwतुक झाले.

या दशकात ओटीटी प्लॅटफॉर्म हे नवीन माध्यम विस्तारत असतानाच ऋतुराजने विविध प्रकारच्या वेब सीरिजमध्ये बहुढंगी व्यक्तिरेखा साकारण्याची उत्तम संधी म्हणून त्यात वाटचाल सुरू केली आणि त्यात त्याला उत्तम यशही प्राप्त झाले. ‘द टेस्ट केस’ ( 2017), ‘हे प्रभू’ (2019), ‘क्रिमिनल जस्टिस’ (2019), ‘अभय’ (2019), ‘बंदीश बैंडिक्स’ (2020), ‘मेड इन हेवन’ (2022). अशा पद्धतीने मालिका व वेब सीरिजमध्ये त्याने सगळे लक्ष पेंद्रित केल्याने चित्रपटाकडे फारसं लक्ष दिले नाही. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया ’ या चित्रपटात त्याने वरुण धवनच्या पित्याची भूमिका साकारली. ‘युनिक’ या तामीळ भाषेतील चित्रपटात भूमिका केली. ‘यारिया 2’ हा त्याने भूमिका साकारलेला शेवटचा चित्रपट ठरला. आपल्या कामाबद्दल पूर्ण समाधानी असणे आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणे अशा वैशिष्टय़ांमुळे तो मनोरंजन क्षेत्रात ओळखला जात असे.