राज्यात सरकार अस्तित्वात आहे का? आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

ड्रग्ज, गुन्हेगारीमुळे वातावरण गढूळ, मिंधे सरकार कंत्राटदारांचे की सर्वसामान्यांचे

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी चुकीच्या कामांना सरकार दुजोरा देत असल्याचे दिसत आहे. हे सरकार कंत्राटदारांचे आहे की, सर्वसामान्याचे आहे? राज्यात मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज सापडत आहे. पोलीसदेखील कारवाई करीत आहेत. मात्र राजकारणी लोकांचे गुंडांसोबतचे फोटो समोर येत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारवर केला.

पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते बोलत होते. आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यातील मेट्रो आणि विमानतळाचे काम झाले आहे. मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना उद्घाटन करायला केळ नाही. नक्की भाजपची काय विचारधारा आहे, हे कळत नाही, असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. मिंधे सरकारने दोन वर्षांत दोन कृषी मंत्री बदलले. परंतु दोघांपैकी कोणीही शेतकऱयांच्या बांधावर गेले नाहीत. दोन वर्षांपासून शेतकऱयांना पीकविमा मिळाला नाही. यामुळे शेतकरी वाऱयावर पडला आहे. या सरकारची भूमिका नेमकी काय आहे, हे यावरून सिद्ध होते.

ते अमावास्या आणि पौर्णिमेला शेती करतात…

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री अमावास्या आणि पौर्णिमेला शेती करायला जातात, हे त्यांच्या आजवरच्या दौऱयांकरून दिसून येते. त्यामुळे काम होऊन केवळ उद्घाटन न केल्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी झालेल्या कामाचे उद्घाटन करून नागरिकांची वाहतूककोंडीमधून सुटका करावी, असेही ते म्हणाले.

‘जनरल डायर’ कोण हे समजायला पाहिजे…

मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. या प्रकरणी अधिकाऱयांची बदली झाली. परंतु अशा मोठय़ा आंदोलनात पोलीस आदेश आल्याशिवाय लाठीचार्ज करीत नाहीत, असा आदेश देणारा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी जनरल डायर कोण आहे, हे समजायला पाहिजे.

भाजपला लोकशाही नको आहे…

‘‘राज्यातील छोटे-छोटे पक्ष संपका,’’ असे किधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाकनकुळे यांनी केले आहे. त्या प्रश्नाकर आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘भाजपने लोकशाही संपकली आहे. गेल्या वर्षी शिकसेना, त्यानंतर राष्ट्रकादी फोडली आणि त्यांचा एक परिकार फोडला. आता काँग्रेस पक्ष फोडण्यात येत आहे. या गोष्टीवर असे दिसते की, भाजपला लोकशाही नको आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.