पीक विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी सेवा रथ; जानजागृतीसाठी शासनाला घालून दिला आदर्श

शासनाकडून एक रुपयात पीक विमा योजना राबवली जात आहे. ही योजना कोकणातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सरपंच आणि रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे यांनी स्वखर्चातून शेतकरी सेवा रथ तयार केला आहे. ऑडिओच्या माध्यमातून या सेवारथातून गावागावांत पीक विमा योजनेची जनजागृती केली जात आहे. योजना लोकांपर्यंत कशी पोहोचवावी याचा जणू पायंडाच बापू शिंदे यांनी घालून दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात आणि नाचणी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे अनेक वेळा शेतीपिकाचे नुकसान होते. अशा वेळी पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे यांनी शेतकरी रथ तयार केला आहे. हा शेतकरी रथ वाडीवस्तीवर जाऊन पीक विमा योजनेची जनजागृती करत आहे.

या शेतकरी सेवारथाचा शुभारंभ माजी सभापती जया माने यांच्या हस्ते करण्यात आता. यावेळी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत उर्फ बापू शिंदे, उपतालुकाप्रमुख शेखर कोलते, भडकंबाचे माजी सरपंच शेखर आपटे, बंड्या माने, महेश सावंत, प्रवीण जोशी, राजा वाघधरे, केतन दुधाणे, दत्ता वाघधरे, लक्ष्मण कदम, विजय सावंत, बंड्या केळकर, सुमित वाघधरे, राजू निंबाळकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.