प्रवेशाच्या नावाखाली 13 विद्यार्थ्यांची फसवणूक 

 

जेएनएम नार्सिंग प्रवेशाच्या नावाखाली 13 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी चार जणाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार तरुणी ही दहिसर येथे राहते. तिच्या मैत्रिणीने नार्ंसग प्रवेशाबाबत दहिसर येथील एका संस्थेची माहिती दिली होती. त्या माहितीनंतर नार्ंसग प्रवेशाच्या चौकशीसाठी तरुणी ही त्या संस्थेत गेली. त्यानंतर दुसऱया दिवशी ती तरुणी पुन्हा त्या संस्थेत आली. तेथे तिला एक जण भेटला. एकच सीट शिल्लक असल्याचे सांगून तिला प्रवेश घेण्यासाठी दबाव टाकला. त्यावर विश्वास ठेऊन तरुणीने सुरुवातीला काही रक्कम देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देऊ असे एकाला सांगितले. त्यानंतर तरुणीने प्रवेश नक्की झाला का याबाबत एकाकडे विचारणा केली. तेव्हा तो तिला उडवाउडवीची उत्तरे देत असायचा.  हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने चौकशी केली. विद्यार्थिनींना परीक्षेबाबत वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात असायच्या. जानेवारी महिन्यात 13 जण परीक्षेसाठी बेंगलोर येथे गेले. तेव्हादेखील त्याची परीक्षा घेतली गेली नाही. परीक्षा न झाल्याचे कोणालाही सांगू नये असे त्यांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर त्यांना एक प्रवेशाबाबत चिट्टी पाठवली होती. त्यावर तात्पुरता प्रवेश असे लिहिले होते. परीक्षेबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून  दहिसर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.