नीरव मोदीचा जामीन फेटाळला

 

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी फरार नीरव मोदीचा आणखी एक जामीन अर्ज लंडन कोर्टाने फेटाळला आहे. नीरव मोदीने लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात पाच वेळा याचिका दाखल केली होती; परंतु कोर्टाने त्याला दिलासा दिला नाही. नीरव मोदी गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात आहे. प्रदीर्घ तुरुंगवासाचा हवाला देत त्याने पाचव्यांदा याचिका दाखल केली होती. त्याची यापूर्वीची याचिका साडेतीन वर्षांपूर्वी फेटाळण्यात आली होती.