भाऊसाहेब वाकचौरे यांचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला; कोपरगावात ‘मशाल रॅली’

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा प्रचार शिगेला पोहचला असून १३ मे रोजी मतदान होणार  आहे. बुधवारी सायंकाळी कोपरगाव शहरातून जय भवानी जय शिवाजी घोषणा देत भव्य मशाल रॅली काढण्यात आली. कोपरगावकरांचे लक्ष वेधले आहे. 
या मशाल रॅलीत आ नितीन देशमुख,अंकीत प्रभु, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ता संदीप वर्पे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष भावेश थोरात शहर सोशल मीडिया शहराध्यक्ष ऋतुराज काळे,  माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे प्रमुख शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सनी वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्रीरंग चांदगुडे ठाकरे गट ग्राहक मंच जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर मनोज कपते काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन शिंदे, तालुका अध्यक्ष आकाश नागरे, शहराध्यक्ष रवींद्र साबळे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल शिवसेना ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सपना मोरे, तालुकाप्रमुख राखी विसपुते, माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे, अश्विनी होणे,  पायल पवार, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष पुष्पा भगत, माजी शहराध्यक्ष भरत मोरे, माजी शहराध्यक्ष असलम शेख माजी उपशहर प्रमुख गगन हाडा माजी शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल, वाहतूक सेना अध्यक्ष इरफान शेख विकास शर्मा बाळासाहेब साळुंखे, राहुल देशपांडे, प्रकाश शेळके सिद्धार्थ शेळके रवि कथले माजी नगरसेवक अनिल जाधव, ज्ञानेश्वर भगत, चंद्रकांत बागुल, स्वप्निल पवार, रिंकू मगर, ओंकार वढणे, कुकूशेठ सहानी, हशभभाई  पटेल शिवसेना  (ठाकरे पवार गट)  नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष जिल्हा प्रमुख माजी जिल्हाप्रमुख पदाधिकारी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)अशी कार्यकर्त्यांची फळी उपस्थित होती.
शिवसेना पक्ष (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी भेट देत मतांचा जोगवा मागत आहेत. रात्रीच्या वेळी वकील इंजिनियर डॉक्टर मेडिकल असोसिएशन व्यापारी अधिकारी कर्मचारी यांच्या बैठकी घेण्यात येत आहेत  याचबरोबर सर्व पदाधिकारी  प्रचाराची रणनीती आखली जात आहे. सर्वांनी उमेदवाराचा  जोरदार प्रचार सुरू केला आहे. शहरासह ग्रामीण मधून उद्धव ठाकरे सेनेचे उमेदवार भाऊसाहेब  वाकचौरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.