कोव्हिशिल्ड लस मागे घेतली

कोव्हिशिल्ड लसीचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी अॅस्ट्राझेनेकाने जगभरात आपली कोविड-19 लस खरेदी करण्याचा आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. लसीमुळे दुष्परिणाम होत असल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कोविड-19 लसीचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात. कोरोना लसीमुळे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम होऊ शकतो, असेअॅस्ट्राझेनेकाने फेब्रुवारीमध्ये ब्रिटिश उच्च न्यायालयात सांगितले होते. या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळय़ा तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

अॅस्ट्राझेनेकावर त्यांच्या लसीमुळे अनेक मृत्यू झाल्याचा आरोप आहे. अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागले. पंपनीविरुद्ध कोर्टात 51 खटले प्रलंबित आहेत. पीडितांनी अॅस्ट्राझेनकाकडून सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. अॅस्ट्राझेनेकाने कोरोनावर उपचार म्हणून वॉक्सझेव्हरिया ही लस निर्माण केली होती. सीरम इन्स्टिटय़ूटने ही लस उत्पादित केली असून ती हिंदुस्थानात कोव्हिशिल्ड नावाने विकली गेली.

नुकसान भरपाई मिळावी

कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम तपासण्यासाठी वैद्यकीय तज्ञ पॅनेल तयार करण्याचे निर्देश जारी करावेत या मागणीसाठी वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. लस घेतल्यानंतर ज्यांना नुकसान झाले आहे त्यांना पेंद्र सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारने फेब्रुवारीमध्ये ब्रिटनमध्ये 163 लोकांना नुकसानभरपाई दिली होती. यापैकी 158 जणांनाअॅस्ट्राझेनेका लस मिळाली होती.