Delhi Liquor Scam: निवडणूक प्रचार हा मूलभूत हक्क नाही; ED चा केजरीवालांच्या जामिनाला विरोध

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयाचा उद्या निकाल येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे. कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊनही त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. आजच्या सुनावणीत ईडीने केजरीवाल यांच्या जमिनाला विरोध केला. निवडणूक प्रचार हा काही मूलभूत हक्क नाही. कुठलाही संविधानिक अधिकार नाही. अशा प्रकारे निवडणुकीचा प्रचार करण्यास जामीन दिला तर कुठल्याही नेत्याला अटक करणं अवघड होईल, असा युक्तिवाद ईडीने केला.

ईडीने आपल्या आरोपपत्रामध्ये केजरीवाल यांचे नाव मुख्य सूत्रधार आणि किंगपिन म्हणून दाखल करणार आहे. ईडीने दावा केला आहे की, अरविंद केजरीवाल यांच्याशी जोडलेल्या मनी ट्रेलचा छडा लावण्यात आला आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरही सुनावणी करण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 21 मार्च रोजी अटक केली होती. याआधी ईडीने याप्रकरणी चौकशीसाठी 9 वेळा समन्स बजावले होते, मात्र केजरीवाल एकाही समन्सला उपस्थित राहिले नाही. ईडीने आरोप केला आहे की, अरविंद केजरीवाल या घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार असून मद्य व्यापाऱ्यांकडून त्यांनी लाच लाच मागण्यात त्यांचा थेट सहभाग होता. तर आरोप फेटाळून लावणाऱ्या ‘आप’ने दिल्लीत नेतृत्व बदल होणार नसून मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील, असे सांगत आहे.