उपासमारीचे संकट वाढले! संयुक्त राष्ट्राचा चिंताजनक अहवाल

जगातील उपासमारीचे संकट अधिक गडद झाले आहे. 2023 मध्ये अन्न सुरक्षेचा प्रश्न अधिक बिकट बनला. गाझा पट्टी आणि सुदानमधील संघर्षामुळे 28 कोटींपेक्षा अधिक लोकांची उपासमार होत आहे, असा चिंताजनक अहवाल संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. 2022 मध्ये 24 कोटीं लोकांवर उपासमारीचे संकट होते. अन्न सुरक्षा सूचना नेटवर्कच्या अहवालानुसार, जागतिक वातावरण बदलाच्या घटना आणि आर्थिक झटके यामुळे अन्न  सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

गाझा पट्टीत भूकबळी

सुदान आणि गाझा पट्टीमध्ये  अन्न सुरक्षा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणच्या लोकांना एकवेळचे अन्न मिळवणेदेखील कठीण झाले आहे. गेल्या वर्षी गाझामध्ये 7 लाख लोक भूकबळीच्या उंबरठय़ावर होते. हा आकडा आता 11 लाखांपर्यंत वाढला आहे. युद्धामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे अन्न आणि कृषी संघटनेच्या आपत्कालीन कार्यालयाचे फ्लेर वाऊटर म्हणाले आहेत.

हुती येथे राजकीयदृष्टय़ा अस्थिरता असून, कृषी उत्पादन घटले आहे. अल निनोमुळे पश्चिम आणि दक्षिण आफ्रिकेत गंभीर दुष्काळ आहे. युद्ध आणि असुरक्षिततेमुळे 20 देशांत उपासमार आहे. परिणामी 135 लोक प्रभावित झालेत. पूर, दुष्काळ आणि वातावरण बदल हे 18 देशांतील 720 लाख लोकांच्या खाद्य असुरक्षेचे कारण बनलंय. आर्थिक झटक्यांनी 21 देशांतील 750 लाख लोक परिस्थितीशी झगडत आहेत.

2023मध्ये डेमोव्रेटीक रिपब्लिक ऑफ कांगो आणि युव्रेनसह 17 देशांच्या स्थितीत सुधार झाला.