स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत ‘हाय सिक्य़ुरिटी’

हिंदुस्थानचा  स्वातंत्र्यदिन अवघ्या चार दिवसांवर आला आहे. दिल्लीत लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवव्यांदा ध्वजारोहण करतील. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ला परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लाल किल्लाच्या 300 मीटर परिसरात पॅरा मिलिटरी पर्ह्स तैनात करण्यात आले. 16 ऑगस्टपर्यंत दिल्लीत ड्रोन आणि पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीसह देशभरात हाय सिक्युरिटी तैनात करण्यात आली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम जी-20 आहे. यावेळी वेगवेगळय़ा राज्यांतून 72 जोडप्यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. ज्यात 50 जोडपे हे मनरेगा योजनेतील आहेत. याशिवाय, स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमासाठी 5500 लोकांना निमंत्रण पाठवले आहे. ज्यात सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये काम करणाऱया कामगारांचाही समावेश आहे.