शिरीष कणेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार 

कणेकरी शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक आणि फिल्मी गप्पाष्टकांची मैफल रंगवणारे बहारदार वक्ते शिरीष कणेकर यांचे मंगळवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा मुलगा व मुलगी अमेरिकेतून आल्यानंतर कणेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. त्यानुसार उद्या, 28 जुलै रोजी दुपारी शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

अंत्यसंस्काराआधी कणेकर यांचे पार्थिव  स्मशानभूमीतील सभागृहात सकाळी 11 ते 1 यावेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. 

  • मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे व ज्येष्ठ सिने पत्रकार दिलीप ठाकूर यांनी आज कणेकर यांच्या निवासस्थानी जाऊन श्रीमती कणेकर व इतर कणेकर कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.