कोरोनानंतर आता ‘या’ व्हायरस बाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त करत दिला इशारा

कोरोनाचे संकट दूर झाले असताना आता आणखी एका व्हायरसबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लंडन येथील पीट्सबर्गमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’वर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुचिपुडी यांनी इशारा देत एच5एन1 व्हायरसबाबत चिंता व्यक्त केली आहे.शिवाय हा व्हायरल वाढल्यास महामारीचे कारण होऊ शकतो आणि कोरोनापेक्षा 100 पटीने धोकादायक असू शकतो असा दावा कुचिपुडी यांनी केला आहे.

डॉ. सुरेश कुचिपुडी यांनी चिंता व्यक्त करत बर्ड फ्ल्यूचे संक्रमण वेगाने महामारीचे रूप घेऊ शकते. याचा मृत्यू दर पाहता हा व्हायरस कोरोना पेक्षा जास्त धोकादायक असू शकतो असे सांगितले आहे. मीडिया अहवालात याबाबत माहिती दिली आहे. अहवालात वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, एच5एन1 व्हायरस गंभीर स्थितीकडे वाढत आहे आणि हा व्हायरल महामारीचे रूप घेऊ शकतो.

डॉ.सुरेश कुचिपुडी यांच्या माहितीनुसार,  एच5एन1 हा व्हायरस मोठ्या संख्येने सस्तन प्राण्यांना संक्रमित करू शकतो, ज्यामध्ये मनुष्यही सहभागी आहे. हा व्हायरल वाढल्यास महामारीचे कारण होऊ शकतो असाही दावा कुचिपुडी यांनी केला आहे. ते म्हणाले की बर्ड फ्लूचे संक्रमण जगभरात आहे आणि सस्तन संक्रमीत आहेत. आता वेळ आली आहे यावर तयारी करण्याची नाहीतर परिस्थिती गंभीर होऊ शकते. एका तज्ज्ञांच्या हवाल्यानुसार, बर्ड फ्ल्यूचे संक्रमण कोराना महामारीपेक्षाही 100 पटीने खतरनाक होऊ शकते. बर्ड फ्ल्यू महामारीमध्ये मृत्यू दर कोरोनाच्या तुलनेत जास्त असेल आणि जर त्याचे मानवांमध्ये उत्परिवर्तन सुरू झाले तर ते अधिक गंभीर होण्याचा धोका आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यानुसार, 2003 पासून एच5एन1 चा मृत्यू दर 50 टक्क्याहून अधिक आहे. जर आपण याची तुलना कोरोना व्हायरसशी केली तर महामारीच्या सुरुवातीला काही ठिकाणी त्याचा मृत्यू दर 20 टक्के होता, जो नंतर केवळ 0.1 टक्क्यांवर आला. बर्ड फ्लूचे आतापर्यंत केवळ 887 रुग्ण आढळले असून त्यापैकी 462 जणांचा मृत्यू झाला आहे.