सुंदर मी होणार – हेअरस्टाइल करताना गरज ‘क्रिम्पिंग’ची

>>शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

अलीकडे हेअरस्टाइल करताना क्रिम्पिंग आयनचा (crimping iron) वापर सर्रास केला जातो. या क्रिम्पिंग आयन मार्केटमध्ये वेगवेगळय़ा आकाराच्या उपलब्ध असतात. मात्र यातली कुठली क्रिम्पिंग आयन आपण घ्यायची हे मात्र आपल्याला समजत नाही. त्याची योग्य माहिती करून आपण क्रिम्पिंग आयन घेतली तर आपल्याला हेअरस्टाइल करताना त्याचा व्यवस्थित उपयोग करता येईल.

मुळात केस सरळ किंवा हलकेसे कुरळे, काही वेळेस खूप कुरळे असे असतात. या केसांना जर वॉल्यूम नसेल आणि जर एखादे एक्सटेंशन त्यामध्ये लावायचे असल्यास ते अगदी सोप्या प्रकारात लावता आले पाहिजे. क्रिम्पिंग केल्यामुळे आपल्याला पटकन एखादी हेअरस्टाइल नीट करता येते.

आपल्या स्ट्रेट केसांना क्रिम्पिंग केल्यास त्याचा वॉल्यूम वाढतो. तसेच जर आपल्या केसांचे कल्स केले तर ते कल्स जास्त दाट वाटतात, तसेच त्याचा वॉल्यूमही वाढतो.

क्रिम्पिंग केल्यामुळे केसांवर कुठल्याही प्रकारची हेअरस्टाइल अगदी नीट करता येते. क्रिम्पिंगचा वापर करताना जर तुम्ही मायक्रो क्रिम्पिंग वापरलेत तर त्याचा इफेक्ट जास्त छान दिसतो.

तेव्हा तुम्हाला जर क्रिम्पिंग आयन घ्यायची असेल तर ती चांगल्या पंपनीची घ्या. जेणेकरून तुम्हाला पुनः पुन्हा खर्च करावा लागणार नाही. तसेच ती वापरण्याचे योग्य तंत्रदेखील तुम्ही शिकून घ्या, म्हणजे तुमचे क्रिम्पिंग अतिशय सुरेख दिसेल व तुमची हेअरस्टाइल इतरांच्या नजरेतही भरण्यास मदत होईल.

कसे कराल…

केसांना स्टाइल करण्याअगोदर क्रिम्पिंग करताना प्रथम बॉक्स सेक्शन काढून घ्यावा लागतो व त्यानंतर पाठच्या केसांना साधारण खालच्या बाजूने सुरुवात करून 45 अंशाच्या कोनात केस वर उचलून पातळ पातळ सेक्शन घेऊन त्यावर क्रिम्पिंग केल्यास ते क्रिम्पिंग जास्त चांगले दिसते. केसांवर खूप जास्त क्रिम्पिंग करू नये. 190 ते 200 टेम्परेचरपर्यंत त्या मशिनचे टेम्परेचर ठेवू शकता.

बऱयाच वेळा क्रिम्पिंग करताना ते घाईघाईत केले जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये गॅप पडून क्रिम्पिंग केसांना योग्य दिसत नाही व अनेक वेळा हेअरस्टाइल नीट होत नाही. त्यामुळे क्रिम्पिंग करताना डॅबडॅब करत व पहिल्या प्लेटवर दुसरी प्लेट अशी एकमेकांमध्ये गुंतवत क्रिम्पिंग करणे गरजेचे असते. जास्त गॅप ठेवून क्रिम्पिंग करू नये.

[email protected]