कोल्हापूरात पावसाचा जोर; पाणीसाठय़ात वाढ

कडाक्याच्या उन्हात पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत दुपारनंतर काही ठिकाणी संततधार पाऊस कोसळला. धरण पाणलोटक्षेत्रातही धुवाँधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठय़ात चार टक्के वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी कोरड्या पडलेल्या नद्यांमध्येही पाणीपातळी वाढताना दिसून येत आहे. आज दिवसभर काहीशी विश्रांती वगळता, पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने तिकडे पाणीच पाणी झाले होते.

धरण पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पाऊस झाल्याने जिह्यातील राधानगरी, दूधगंगा (काळम्मावाडी), वारणा आदी लहान-मोठय़ा अशा एकूण 15 व 91.81 टीएमसी क्षमतेच्या धरण प्रकल्पांत सध्या 1 टीएमसी पाण्याची वाढ झाली असून, 20.77 टीएमसी पाणीसाठा झाला होता. चार दिवसांपूर्वी 19.39 टीएमसी पाणीसाठा होता. 1 जूनपासून आतापर्यंत जिह्यात केवळ 545 मि.मी. पाऊस झाला होता; पण गेल्या 24 तासांत 91 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षी 1 जूनपासून आजच्या दिवसांपर्यंत 758 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

8.361 टीएमसीच्या राधानगरी धरणात 1.88 टीएमसी (22.51 टक्के), 25.29 टीएमसीच्या दूधगंगा (काळम्मावाडी) धरणात 1.43 टीएमसी (5.63 टक्के), 3.471 टीएमसीच्या तुळशी धरणात 0.82 टीएमसी (23.69 टक्के), 34.399 टीएमसीच्या वारणा धरणात 10.88 टीएमसी (31.62 टक्के), 2.774 टीएमसीच्या कासारी धरणात -0.65 टीएमसी (23.60 टक्के), 2.516 टीएमसीच्या कडवी धरणात -0.79 (31.38 टक्के), 2.715 टीएमसीच्या कुंभी धरणात -0.88 टीएमसी (32.49 टक्के), 3.716 टीएमसीच्या पाटगाव धरणात -0.87 टीएमसी (23.33 टक्के), 1.522 टीएमसीच्या चिकोत्रा धरणात -0.42 टीएमसी (27.64 टक्के), 1.886 टीएमसीच्या चित्री धरणात 0.29 टीएमसी (15.25 टक्के), 1.223 टीएमसीच्या जंगमहट्टीत धरणात -0.28 टीएमसी (22.80 टक्के), 1.560 टीएमसीच्या घटप्रभात धरणात -0.94 टी.एम.सी. (60.27 टक्के), 0.820 टीएमसीच्या जांबरे धरणात -0.21 टीएमसी (25.63 टक्के), 1.240 टीएमसीच्या आंबेओहोळ धरणात -0.39 टीएमसी (31.12 टक्के), तर 0.214 टीएमसीच्या कोदे या लघुपाटबंधारे प्रकल्पात 0.04 टीएमसी (20.13 टक्के)पाणीसाठा शिल्लक आहे.