कुल्लूत 30 सेकंदांत सात इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यात गुरुवारी सकाळी अवघ्या 30 सेपंदांत सात इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एकापाठोपाठ एक कोसळल्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने या इमारती तीन दिवसांआधी रिकाम्या केल्या होत्या. राज्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे विविध घटनांत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सात जणांचा मृत्यू मंडीमधील तसेच शिमलातील भूस्खलनामुळे काहींचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, राज्यातील 400 रस्ते बंद करण्यात आले आहेत. कुल्लू-मनाली राष्ट्रीय महामार्गही बंद केला आहे. हवामान विभागाने संपूर्ण राज्यात दोन दिवसांचा मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हिमाचलमधील तीन जिह्यांत शिमला, मंडी आणि सोलनमध्ये आजही शाळा आणि कॉलेज बंद राहणार आहेत. हवामान विभागाने आज उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडसह 15 राज्यांत रेड अलर्ट जारी केला आहे.