कोरोना रुग्णांत वाढ; महाराष्ट्रात पुन्हा क्कारंटाईनची शक्यता

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोविड टास्क फोर्सकडून पाच दिवसांचे गृहविलगीकरण आणि अन्य नियम जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा जेएन.1 या नव्या विषाणूचा फैलाव सुरू झाल्यामुळे देशात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 862 इतकी झाली आहे. ही संख्या वाढत असल्यामुळे कोरोना झाल्यास पाच दिवस घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने सध्या दिला आहे.

काळजी घ्या

गर्दीची सार्वजनिक ठिकाणे शक्यतो टाळावी, गर्दीत मास्क लावावा, सर्दी, खोकला, ताप असलेल्या क्यक्तींचा संपर्क टाळाका, ज्येष्ठांनी विशेष खबरदारी घ्यावी अशा सूचना टास्क फोर्स करण्याची शक्यता आहे.