गाझात अन्नासाठी 12 जण बुडाले

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपण्याचे नाव घेत नाहीये. 23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझात अन्नाचे संकट उभे राहिले आहे. यूएनच्या म्हणण्यानुसार गाझाची 22 लाखांहून अधिक लोकसंख्या उपासमारीच्या वाटेवर आहे. उत्तर गाझामधील बीट लाहिया येथे विमानातून खाली पडलेले अन्नपदार्थ मिळवण्यासाठी धावलेल्या 18 लोकांचा मृत्यू झाला. यातील 12 जण हे समुद्रात बुडाले, तर सहा जणांचा धावपळीत मृत्यू झाला. मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेने गाझाला पहिल्यांदा मदत केली. इस्रायल आणि हमास युद्धात 32 हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, तर 74 हजारांहून अधिक जखमी झाले आहेत.