नयन तारापासून सावध राहा, शाहरूख खानने अभिनेत्रीच्या नवऱ्याला दिला सावधानतेचा इशारा

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. त्याच्या आगामी सिनेमाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला आणि चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. अशातच अभिनेत्री नयनताराचा नवरा विघ्नेश शिवनने त्याची पत्नी नयनतारा आणि ‘जवान’ सिनेमाच्या टीमसाठी खास पोस्ट शेअर केली आहे, त्या पोस्टला शाहरूख खानने उत्तर देत नयनतारापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ हा सिनेमा 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.शाहरूख खान काल 11 जुलैपासून ट्विटरवर सर्व कलाकार आणि क्रूचे वैयक्तिकरित्या आभार मानत आहे. अशातच अभिनेत्री नयनतारा हिचा नवरा विग्नेश शिवन याच्या पोस्टने त्याचे लक्ष वेधले. त्याने विघ्नशच्या पोस्टवर छान उत्तर दिले आहे.  सिनेमाचा ट्रेलर 11 जुलै रोजी बाहेर येताच, विघ्नेश शिवन याने त्याची पत्नी नयनतारा आणि ‘जवान’ सिनेमाच्या क्रू टीमसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याने तिला ‘जवान’साठी शुभेच्छा दिल्या. त्यात त्याने लिहीले आहे की, @atlee47 “बॉलिवुड पदार्पणात अॅटली इतकं अप्रतिम काम करत असताना त्याचा अभिमान कसा वाटू शकत नाही!, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसत आहे. खूप प्रयत्न, संयम आणि प्रचंड मेहनत दिसत आहे. एक घट्ट मिठी. हॅट्स ऑफ. “#नयनतारा खान विरुद्ध तिचे स्वप्नातील पदार्पण. माझ्या लाडक्या अनिरुद्धने काम केले! विजय सेतुपती सर वाह.”

त्यानंतर शाहरूख खानने त्याच्या पोस्टला उत्तर देत विघ्नेशला नयनतारापासून सावध राहण्यास सांगितले. त्याने लिहिले, “@VigneshShivN तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. #नयनतारा छान आहे’ पण अरे मी हे कोणाला सांगत आहे’ तुला आधीच माहित आहे!!! पण पतीदेव, आता जवानच्या सेटवर काही मोठ्या किक आणि पंच शिकली आहे त्यामुळे सावध राहा !!

‘जवान’ चित्रपटातून लेडी सुपरस्टार नयनताराचे बॉलिवूड डेब्यू होत आहे. अॅटली दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख खान दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे. दीपिका पदुकोण दिपिकाचा गेस्ट अपीअरंस असणार आहे, तर प्रियामणी, अमृता अय्यर, सान्या मल्होत्रा ​​आणि इतर अनेक सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. विजय सेतुपती या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.