हा अभिमानाचा क्षण! चांद्रयानाच्या लँडिंगचा सोहळा मुलांसोबत पाहणार; करिना कपूरची प्रतिक्रिया

देशाचा महत्वाकांक्षी चांद्रयान 3 सध्या चंद्राच्या कक्षेत फिरत आहे. 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर सॉफ्ट लँडिग करणार आहे. इस्त्रोसह प्रत्येक भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. त्यामुळे सध्या या विषयाची देशभरात चर्चा आहे. अनेक सेलिब्रिटी याबाबत प्रतिक्रिया देत आहेत. आता याबाबत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया करीनाने दिली. तसेच चांद्रयान 3 चंद्रावर उतरण्याचा क्षण हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्याला हृदयातून याचा अभिमान वाटावा असा हा सोहळा असेल. सध्या प्रत्येक भारतीय याच्या प्रतिक्षेत आहे. मी देखील माझ्या मुलांसोबत हा क्षण अनुभवणार आहे, असे करीनाने सांगितले.

चांद्रयान 2 च्या अपयशानंतर देशाने चांद्रयान ३ मोहिम लॉन्च केली. हे यान 14 जुलै 2023 रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. हे यान 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यामुळे या मोहिमेबाबत सर्व भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तसेच ही मोहि यशस्वी व्हावी, यासाठी शुभेच्छाही देण्यात येत आहे. इस्त्रोची ही मोहिम देशासाठी महत्त्वाची आहे.