मुलांना पाण्यात फेकणाऱ्या महिलेची जन्मठेप कायम, कर्जाची परतफेड न झाल्याचा राग

कर्जाची परतफेड न केल्याचा राग ठेवून शेजारच्या चार लहान मुलांना पाण्यात फेकणाऱ्या महिलेच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

या चार मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार अन्य तीन लहान मुले होती. त्यांच्या साक्षीवर आरोपीने संशय व्यक्त केला होता. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने लहान मुलांची साक्ष निःसंदेह असल्याचा निर्वाळा दिला. काय साक्ष द्यावी हे मुलांना शिकवले गेले नाही. जी घटना घडली त्याचे वर्णन मुलांनी साक्ष देताना केले आहे. त्यामुळे आरोपी महिला संगीता विलास किवाडेला पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम केली जात आहे, असा निकाल न्यायालयाने दिला.

घेतले होते. नंदाने व्याजाचे पैसे परत न केल्याचा संगीताच्या मनात राग होता. 18 नोव्हेंबर 2010 रोजी नंदाची नातवंडे संगीताच्या घरी टीव्ही बघायला गेली होती. रोहित (9), राहुल (7), अनमोल (5) व तेजस (3) अशी मुलांची नावे आहेत. आईक्रीम देत असल्याचे सांगून संगीता मुलांना कॅनलजवळ घेऊन गेली. तेथे तिने सुरुवातीला रोहित आणि राहुलला पाण्यात फेकले. अनमोलला पाण्यात फेकत असताना तो संगीताच्या हाताला चावला आणि पळून गेला. त्याने आरडाओरड करून माणसांना गोळा केले. त्यामुळे रोहित आणि राहुल बचावले, पण 3 वर्षांचा तेजस वाहून गेला. त्याचा मृतदेह दोन दिवसांनी हडपसरला सापडला. याप्रकरणी संगीताविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला.

अशी घडली घटना

पुणे येथील मुकुंदनगर येथे आरोपी संगीता राहते. तिच्याच शेजारी तक्रारदार नंदा राहते. नंदाने संगीताकडून 50 हजार रुपये व्याजाने

न्यायालयाचे निरीक्षण

मारण्याच्या उद्देशानेच संगीताने मुलांना पाण्यात फेकले होते. तिचे हे कृत्य सबळ पुराव्याने सिद्ध झाले आहे, असे निरीक्षण न्यायालयाने निकालात नोंदवले.