Lok Sabha Election 2024 : गोरगरिबांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्यांना धडा शिकवा; चंद्रकांत खैरेंचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध भागांमध्ये प्रचार दौरे सुरू आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनीही गावोगावी जात प्रचार सभांचा सपाटा लावला आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर, चिंचोली, करंजखेड, नागद येथे प्रचार सभेतून त्यांनी मतदरांशी संवाद साधला. गोरगरिबांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन यावेळी चंद्रकांत खैरे यांनी केले.

“2014 मध्ये सोशल मीडिया आणि जाहिरातबाजी करून सत्ता मिळवली. गोरगरिबांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवली. त्यामुळे नोटबंदी, जीएसटी, इलेक्ट्रोल बॉण्डच्या पैशांवर निवडणूक लढवणाऱ्या त्यांची जागा दाखवा,” असे आवाहन चंद्रकांत खैरे यांनी यावेळी मतदारांना केले. यावेळी शिवसेना नेते, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “देशात नोटबंदीचा फटका उद्योजकांना नव्हे तर शेतकरी व कष्टकरी गोरगरिबांनी बसला. भाजपला गोरगरिबांचे काही देणेघेणे नाही. त्यांना फक्त उद्योजकांच्या पैशांची चिंता आहे. महाविकास आघाडी हा जनसामान्यांचा बुलंद आवाज आहे. जो सत्तेची पर्वा न करता गोरगरिबांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देतो. प्रत्येक शिवसैनिक आपल्या सुख दु:खात हजर आहे. यापुढे सुद्धा प्रत्येक शिवसैनिक आपल्या सेवेत कुठल्याही लाभाची पर्वा न करता हजर राहील. अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी दुष्काळात तोंड दाखवले नाही. कोरोनात भाजपने काही केले नाही. देशात महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, अराजकता वाढवली म्हणून यांना घरी बसवणे गरजेचे आहे,” असे यावेळी दानवे म्हणाले.

प्रचार सभेला महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार उद्यसिंग राजपुत, माजी आमदार नामदेव पवार, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड , आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब मोहिते पाटील, तालुकाप्रमुख संजय मोटे, अन्नासाहेब शिंदे, शिवाजीथेटे, गोकुळ डहाके, युवा सेनेचे उमेश मोकासे, योगेश पवार, विलास पाटणी, संजय पिंपळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसन्ना पाटील, बाबा मोहिते, काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष याकुब भाई, संजय मोटे, संजय पिंपळे, पद्माकर इंगळे सर, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र आदमाने पाटील, अवचित नाना वळवले, श्रीरंग आमटे पाटील, किशोर नागरे, संदेश कवडे, गजानन मनगटे, प्रविण जाधव, भगवान काजे, विलास पटणी, उमेश मोकाशे, विलास पवार, योगेश पवार, आप चे सैय्यद सलाउद्दीन, रविंद्र पिंपळे, पंजाब शेळके, सोनल पाटील, गंपु जाधव, गजानन मनगटे, किशोर नागरे, संदेश कवडे, प्रवीण जाधव, पद्माकर इंगळे, प्रसन्न पाटील, गणेश शिंदे, याकुब भाई, विश्वास मनगटे, मोगल वाघ, विश्वनाथ मनगटे, प्रकाश जैस्वाल, ज्ञानेश्वर वाडेकर, राजु पवार, दिपक कायस्थ, विश्वास मनगटे, विठ्ठल मनगटे, विनायक पवार, नानाभाऊ पवार, विजय घुले, करंजखेड येथील नासेर खान आदींची उपस्थिती होती.