Lok Sabha Election 2024 Live Update : महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 5 जागांसह देशभरातील 102 जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. महाराष्ट्रातील रामटेक, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लोकसभेसह अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभेसाठीही आज मतदान पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेचे लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर…

हे वाचा – लगीनघाईआधी बोटाला शाई; मुंडावळ्या बांधलेला नवरदेव थेट मतदान केंद्रावर दाखल

हे वाचा – छगन भुजबळ यांची नाशिकच्या जागेवरून माघार, पत्रकार परिषद घेत केले जाहीर

Exclussive : काँग्रेस उमेदवारासमोर ‘कॅन्सल’चा शिक्का; चंद्रपुरातील मतदान केंद्रावर राडा

  • महाराष्ट्रात 3 वाजेपर्यंत 44.12 टक्के मतदान

  • महाराष्ट्रात 1 वाजेपर्यंत 32.36 टक्के, त्रिपुरामध्ये सर्वाधिक 53.04 टक्के मतदान

  • राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी चंद्रपूर शहरातील सिटी माध्यमिक शाळेत सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला

  • महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 19.17 टक्के मतदान
  • 11 वाजेपर्यंत कोणत्या राज्यात किती मतदान?

अंदमान आणि निकोबार आयलंडमध्ये 21.82 टक्के, अरुणाचल प्रदेशमध्ये 18.26 टक्के, आसाममध्ये 27.22 टक्के, बिहारमध्ये 20.42 टक्के, छत्तीसगढमध्ये 28.12 टक्के, जम्मू आणि कश्मीरमध्ये 22.60 टक्के, लक्ष्यद्वीपमध्ये 16.33 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 30.46 टक्के, महाराष्ट्रामध्ये 19.17 टक्के, मणिपूरमध्ये 27.64 टक्के, मेघालयमध्ये 31.65 टक्के, मिझोरममध्ये 26.23 टक्के, नागालँडमध्ये 22.50 टक्के, पुद्दुचेरीमध्ये 27.63 टक्के, राजस्थानमध्ये 22.51 टक्के, सिक्कीममध्ये 21.20 टक्के, तमिळनाडूमध्ये 23.72 टक्के, त्रिपुरामध्ये 33.28 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 25.20 टक्के, उत्तराखंडमध्ये 24.83 टक्के

  • अरुणाचल विधानसभेसाठी 11 वाजेपर्यंत 19.46, तर सिक्कीम विधानसभेसाठी 21.20 टक्के मतदान

  • नागपुरात 11 वाजेपर्यंत 17.53 टक्के, भंडारा-गोंदियात 19.72 टक्के, तर गडचिरोली-चिमूरमध्ये 21.82 टक्के, रामटेकमध्ये 16.14 टक्के, चंद्रपूरमध्ये 19.94 टक्के मतदान
  • काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील सुकळी या गावी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला

  • जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे हिने नागपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सपत्नीक मतदान केले

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला
  • अभिनेता कमल हसन, अभिनेता विजय सेतुपती याने चेन्नईमध्ये मतदान केले

  • विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्नी व मुलीसह मतदानाचा हक्क बजावला

  • चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान
  • आधी लगीन लोकशाहीचं! बोहल्यावर चढण्यापूर्वी चंद्रपुरात नवरदेवाने केले मतदान

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)