Photo – ईशान्य मुंबईत भगवे वादळ, संजय दिना पाटील यांनी भरला उमेवारी अर्ज

फोटो- रूपेश जाधव

विशिष्ट पद्धतीने सजवलेला ट्रक, वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा आणि नऊवारी साडीत धरलेला लेझीमचा ठेका अशा उत्साही आणि भगवेमय वातावरणात आज महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी उमेवारी अर्ज भरल्यानंतर प्रचार रॅली काढण्यात आली.यावेळी युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते , शिवसैनिक मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.