कांद्यापाठोपाठ टोमॅटोनेही रडवले किलोचा भाव 80 रुपयांवर

378

कांद्याने डोळ्यांत पाणी आणल्यानंतर आता टोमॅटोने राजधानी दिल्लीकरांना रडवायला सुरुवात केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या प्रमुख उत्पादक राज्यांतील पावसाच्या थैमानामुळे दिल्लीत टोमॅटोची आवक पार घटली आहे. दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ विक्रीच्या भावाने किलोला 80 रुपये अशी उच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या काही दिवसांत बाजारात आवक पार कमी झाल्याने टोमॅटोचे भाव भडकल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.

दिल्लीत बुधवारी टोमॅटोच्या दराने किलोला 54 रुपये दरावरून थेट 60 ते 80 रुपये दरावर झेप घेतली.1 ऑक्टोबरला हाच दर किलोला 45 रुपये होता. मदर डेरीच्या सफल आऊटलेटमध्ये टोमॅटो 58 रुपये किलो दराने तर किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो दराने विकला जात होता. कांद्याची मात्र राजधानीत 60 रुपये किलो अशी काहीशी घसरण झाली आहे.

अन्य महानगरांतही टोमॅटो ‘लालेलाल’

तुफानी पावसामुळे पिकात घट झाल्याने दिल्लीसह कोलकाता, मुंबई, चेन्नई या महानगरांतही टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. किरकोळ बाजारात कोलकाता येथे टोमॅटो किलोला 60 रुपये, मुंबईत किलोला 54 रुपये तर चेन्नईत किलोला 40 रुपये अशा चढय़ा भावाने विकला जात आहे. केंद्र सरकारी संस्थानीच टोमॅटो बाजारात अधिक ‘लालबुंद’ होऊन ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणत असल्याची माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या