महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे शिक्षकांना मतदार नोंदणीसाठी आवाहन

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीसाठी पहिल्या टप्प्यात 6 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी सुरू होती. या काळात नाशिक विभागातून जवळपास 47 हजार शिक्षक बंधू आणि भगिनींनी मतदार नोंदणी केली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदार नोंदणी 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यासाठी जास्तीतजास्त शिक्षकांनी मतदार नोंदणी करावी,असे आवाहन महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्य अध्यक्षा आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या शुभांगी पाटील यांनी शिक्षकांना मतदार नोंदणीचे आवाहन केले आहे.

आपल्या हक्कांसाठी, आपले मतदान हे प्रचंड महत्वाचे आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीसाठी पहिल्या टप्प्यात मतदार नोंदणी 6 नोव्हेंबर पर्यंत सुरू होती. या काळात नाशिक विभागातून जवळपास ४७ हजार शिक्षक बंधू आणि भगिनींनी मतदार नोंदणी केली आहे. पहिल्या टप्प्यात प्राधान्याने नाव नोंदणी केलेल्या सर्व मतदारांचे मनापासून अभिनंदन !

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणीचा दुसरा टप्पा पुन्हा सुरू होत असून गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर 2023 पासून 9 डिसेंबर 2023 पर्यंत मतदार नोंदणीची मुदत आहे. सध्या शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण जास्तीत जास्त शिक्षक बांधवांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे असे नम्र आवाहन करत आहोत, असे पाचील यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.