महिनाभरात सुरक्षा ठेव न भरल्यास वीज कापणार; महावितरणची 48 लाख ग्राहकांना नोटीस

महावितरणने 2352 कोटी रुपयांच्या सुरक्षा ठेव रकमेच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार अद्याप सुरक्षा ठेव रक्कम न भरलेल्या तब्बल 48 लाख वीज ग्राहकांना नोटीस पाठवत पुढील एक महिन्यात सदरची रक्कम न भरल्यास संबंधितांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे बजावले आहे. त्यामुळे आधीच अवाच्या सवा वीज बिलामुळे मेटाकुटीला आलेल्या वीज ग्राहकांच्या खिशाला सुरक्षा ठेव रकमेची चाट लागणार आहे.

वीज नियामक आयोगाने महावितरणला आपल्या ग्राहकांकडून त्यांच्या वीज वापरानुसार सुरक्षा ठेव वसूल करण्यास परवानी दिली आहे. त्यानुसार महावितरणने आपल्या ग्राहकांना सुरक्षा ठेव भरण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात बिले पाठवली आहेत. मात्र महावितरणचा विजेचा दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याने येणाऱया अवाच्या सवा वीज बिलामुळे ग्राहकांच्या खिशाला आधीच मोठी झळ बसत आहे. त्यामुळे ग्राहकांनी सुरक्षा ठेवीची रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यामुळे महावितरणने तब्बल 48 लाख ग्राहकांना नोटीस पाठवत तत्काळ पैसे भरण्याबाबत बजावले आहे. त्यामुळे ग्राहकाने वेळेत पैसे न भरल्यास वीज कनेक्शन कापले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.