परदेशी शिकायला जाणाऱ्यांच्या मनात काय? कॅनडाला झटका, अमेरिकेची ओढ

दरवर्षी लाखो विद्यार्थी परदेशात शिक्षण घ्यायला जातात. हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती अमेरिकेला आहे. त्याखालोखाल कॅनडा येथे शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांचे प्रमाणही जास्त होते. मात्र गेल्यावर्षी हिंदुस्थान आणि
कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंधात कटुता निर्माण झाल्यानंतर कॅनडात एमबीएची पदवी मिळवण्यासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत घट दिसून येतेय. 2023 या वर्षात ही घट जास्त आहे.

2019 च्या तुलनेत कॅनडामध्ये शिकायला जाणाऱया विद्यार्थ्यांच्या प्रमाणात 9 टक्के घट झाली आहे.एमबीए पदवी मिळवण्यासाठी हिंदुस्थानचे विद्यार्थी कॅनडाला जास्त प्राधान्य देत होते. यामागे नोकरीच्या घटलेल्या संधी, तिथली आर्थिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे समजते.

अमेरिकेला टॉपची पसंती                                                                                              

आजही हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची अमेरिकला टॉपची पसंती आहे.  38 टक्के हिंदुस्थानी मुले अमेरिकेत गेली आहेत, मध्य आणि दक्षिण आशियाला त्याखालोखाल पसंती आहे.या देशांत 26 टक्के, तर पश्चिम युरोपमध्ये 24 टक्के आहेत.